प्रिय वाचक,
शैक्षणिक संदर्भच्या वाटचालीतील एक महत्त्वाचे स्थित्यंतर आपल्याला सांगायचे आहे.
१९९९ ऑगस्टपासून दर दोन महिन्यांनी आम्ही अंक प्रकाशित करत आलो.
मराठीतून चांगले विज्ञान वाचायला मिळावे, मुलांच्या कुतूहलाला प्रोत्साहन मिळावे, अनुभवांना जोडून असलेल्या विज्ञानाची सहज ओळख व्हावी आणि मुख्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा असे उद्देश यामागे होते.
आमची मूळ प्रेरणा होती – त्यावेळी एकलव्य होशंगाबाद प्रकाशित करत असलेले शैक्षिक संदर्भ. एकलव्यने मोठ्या आनंदाने मराठीत द्वैमासिक काढायला, अनुवाद करून छापायला परवानगी आणि प्रोत्साहनही दिले. शिवाय मराठी विज्ञान-लेखकांनी वेळोवेळी साहाय्य केले, अनुवादकांनी तत्पर आधार दिला, कोणत्याही मोबदल्याशिवाय. त्यामुळे हा ना-नफा प्रयत्न २०१८पर्यंत सुरळित चालू राहिला.
मात्र त्यानंतर हा प्रयत्न ना-तोटा सदरात चालवणेदेखील गरजेचेच असल्याने शैक्षणिक संदर्भची छापील आवृत्ती न काढता इ-अंक प्रकाशित करण्याची सुरुवात केली.
२०२५ साली अंकाचे स्वरूप बदलून नव्या आणि भाषांतरित लेखांसह काही audio, video, कधी जुन्या लेखांचा परिचय व त्यांची लिंक, कधी कथावाचन, लेखवाचन या रूपात संवाद साधायला सुरुवात केली आहे.
आपले,
संपादक,
शैक्षणिक संदर्भ.